शालेय स्तरावरील प्रवेश व स्पर्धा परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी आहे.
Students gain confidence to face upcoming competitive exams education career
Students gain confidence to face upcoming competitive exams education career sakal
Summary

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी आहे.

के. रवींद्र

मागील लेखात आपण राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश, स्पर्धा, व शिष्यवृत्ती परीक्षांबद्दल माहिती घेतली, तसेच या लेखात आपण राज्यपातळीवरील परीक्षांचा आढावा घेऊया, जेणेकरून विद्यार्थी भविष्यातील येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढेल व गुणवत्ता सुधारण्यास वाव मिळेल.

राज्य स्तरावरील परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असावा. परीक्षेमध्ये मराठी (प्रथम भाषा), गणित, इंग्रजी (तृतीय भाषा), बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश आहे.

लिंक https://www.mscepuppss.in/

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आठवी उत्तीर्ण व पालकांची वार्षिक उत्पन्न ३.५ लाख रुपये आहे. आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आठवीसाठी सुरू केली आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

लिंक ः https://nmmsmsce.in/

राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ः ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’तर्फे घेण्यात येणारी परीक्षा राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील दोन हजार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत (अगदी Ph.D पर्यंत) करण्यात येते, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील दहावीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थिनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी कोणतीही अट नाही.

लिंक : https://www.ntsemsce.in

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ः राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीय,आदिवासी व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी शासकीय विद्यानिकेतनमार्फत उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्याचे वय ११ ते १५ वर्षे (संवर्गनिहाय)पेक्षा जास्त नसावे. (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे.

लिंक : http://www.mscepune.in

डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा ः विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, संशोधन व वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने ही परीक्षा इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविली जाते. या परीक्षेमध्ये विज्ञान परिसर व जिज्ञासा, बुद्धिमत्ता चाचणी, शोध, पर्यावरण, वैज्ञानिक चालू घडामोडी अशा विविध विषयांचा अंतर्भाव केला जातो.

लिंक ः https://drcvramanexam.in/

क्रीडा प्रबोधिनी - राज्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या हेतूने राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीकरिता यासाठी गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना तंत्रशुद्धपद्धतीने प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, गणवेश, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात. राज्याच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेश आणि क्रीडानिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी आणि अनिवासी प्रवेश दिला जातो.

लिंक : https://sports.maharashtra.gov.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com