मुक्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे आता डिजिलॉकरवरही मिळणार

YCMOU
YCMOUesakal

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकर सुविधेद्वारे देण्याच्या प्रणालीचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० मधील मे २०१९ व मे २०२० मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण दोन लाख ९० हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. उर्वरित म्हणजे पहिल्या दीक्षान्त सोहळ्यापासून ते २५ व्या दीक्षान्त समारंभापर्यंतची पदवी प्रदान झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे टप्प्याटप्प्याने डिजिलॉकरवर उपलब्ध होतील.


विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग पर्यवेक्षक प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये देण्यासंबंधी दिलेल्या निर्देशान्वये डिजिलॉकरवर ॲकॅडेमिक ॲवॉर्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे. त्यानुसार २०१९ व २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २६ व्या दीक्षान्त समारंभाची एकूण दोन लाख ९० हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.

पदवी प्रमाणपत्र कसे मिळवाल?

यासाठी विद्यार्थ्यांनी digilocker.gov.in या संकेतस्थळावर अथवा डिजिलॉकर ॲप मोबाईल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आपल्या आधार क्रमांक अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांनी एज्युकेशन या विकल्पावर क्लीक करून आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव निवडावे व नंतर पदवी प्रमाणपत्र हा विकल्प निवडून आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यास त्याचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होईल.

YCMOU
नाशिक : पोलिस शिपायाच्या अंत्ययात्रेत आयुक्तांनी दिला खांदा

क्यूआर कोड स्कॅन केल्यास माहिती मिळणार आहे. प्रमाणपत्रावर क्यूआरकोड असून, त्यास स्कॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला आहे, अशा विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक केले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून, त्यास माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर वैधता राहील. विद्यार्थ्यांना डिजिलॉकर ॲप डाउनलोड करून अकाउंट उघडावे लागेल. गेट द डॉक्युमेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी विकल्पावर क्लीक करावे लागेल. नंतर कायम नोंदणी क्रमांक टाकून परीक्षा उत्तीर्णतेचे वर्ष निवडावे लागेल. नंतर विद्यार्थी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील. दरम्यान, देशातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्थांपैकी १७६ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्थांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली असून, डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानंतर महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ ठरले आहे.

YCMOU
डेंगीने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com