
TET Exam 2019 : 'त्या' 293 उमेदवारांना राज्य परीक्षा परिषदेचा दणका
पुणे : जानेवारी २०१९ च्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार करून बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून पात्र झालेल्या उमेदवारांची संपादणूक रद्द करून त्यांच्यावर शास्ती करण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी बुधवारी काढला. पुणे सायबर पोलिसांकडे २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये ७ हजार ८८० उमेदवार परीक्षेतील गैरप्रकारात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते.
प्रत्यक्षात अपात्र असतानाही केवळ गैरप्रकार करून संबंधित उमेदवारांनी स्वतःस पात्र करून घेतलेल्यांची धक्कादायक माहिती पुढे आली होती. शिक्षक पात्रता परीक्षेच्या २०१९ चा अंतिम निकाल २८ ऑगस्ट २०२० मध्ये परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ७५०० उमेदवार गैरप्रकारांमध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९३ उमेदवारांनी आरोपींसोबत संगनमताने बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरित ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.
Web Title: Tet Exam 2019 State Examination Council Notice To 293 Candidates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..