Career: तत्वज्ञानात रुची आहे? स्पर्धा परीक्षांसह करिअरची अनेक दारं होतात खुली

Philosophy
Philosophy

पुणे : तत्वज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या भरपूर संधी असलेलं हे क्षेत्र आहे. या विषयात बीए, बीएड केल्यानंतर शाळेत सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक, तर एमए, पीएचडी केल्यानंतर महाविद्यालयांत अध्यापनाच्या भरपूर संधी आहेत. तसेच संशोधन क्षेत्रातही काम करण्याच्या संधी आहेत. तर्कशास्त्र सोबत नैतिकता देखील आवश्यक आहे, मग तो व्यवसाय असो वा राजकारण वा शिक्षण.

तत्वज्ञान बनवू शकते करिअर 

जर तुम्ही बारावीनंतर या विषयात प्रवेश घेतला तर करिअरचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. तसं पाहिलं तर हा विषय विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठीचा मार्ग दाखवतो. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान विषय निवडण्यासाठी अनेकजण पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर फिलॉसॉफीचा अभ्यास करत आहेत. कला शाखेचे विद्यार्थी तर्कशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीही तत्वज्ञानचा अभ्यास करतात. त्याचे पेपर्स कॅट किंवा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीत उपयुक्त ठरतात.

स्पर्धा परीक्षेत तत्वज्ञान निभावते महत्वाची भूमिका 

तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात नीतिशास्त्रातील विविध पैलूंचा अभ्यास करता येत असल्याने याचा अभ्यास जागोजागी उपयोगी पडतो, तसेच आपल्या व्यक्तिमत्वातही सुधारणा होते. तत्वज्ञान विषयात बी.ए. आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतात. ते चांगले व्यवस्थापक बनू शकतात. तसेच एक चांगला वकील आणि पत्रकारदेखील होण्याची दाट शक्यता निर्माण होते. एमबीएसाठी घेण्यात येणाऱ्या कॅट परीक्षेत जवळपास ३० टक्के प्रश्न हे रिजनिंग (तर्क) विषयी विचारले जातत. त्यामुळे तत्वज्ञानाची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करू शकतात.

सिव्हिल सर्व्हिसमध्ये तत्वज्ञान विषयाचे विशेष योगदान

एक चांगला वकील तर्काच्या आधारे कोर्टात आपला मुद्दा ठामपणे मांडू शकेल. तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात तर्क करण्याची क्षमता विकसित होत असते. बीएनंतर एलएलबीला अॅडमिशन घेणारे विद्यार्थी भविष्यात चांगले वकील होऊ शकतात. तसेच नागरी सेवेत तत्वज्ञान हा विषय मुख्य परीक्षेसाठी निवडणाऱ्यांची संख्याही अलीकडील काळात वाढत चालली आहे. 

हाच मुद्दा पत्रकारितेलाही लागू पडतो. जर माध्यमात काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या घटनेवर किंवा विषयावर गंभीर आणि तर्कशुद्ध विश्लेषण करत स्वत: ला चांगला पत्रकार म्हणून सिद्ध करू शकता. तत्वज्ञानात सौंदर्य (एस्थेटिक्स) चा ही अभ्यास केला जातो, त्यामुळे आर्ट क्रिटिकच्या क्षेत्रातही ठसा उमटवू शकता. पर्यावरणीय समस्यांमध्ये नीतिशास्त्र का वापरले जाते, यामध्येही तत्वज्ञान उपयोगी पडू शकते. म्हणून देशभरात चालणाऱ्या विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळू शकते. 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com