engineering
engineering sakal media

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद: अभियांत्रिकीच्या ४० हजार जागांना मान्यता

मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (Akhil Bharatiya Tantrashikshan Parishad) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल ४० हजार जागांना मान्यता दिली आहे. यात पारंपरिक अभियांत्रिकी (Engineering) जागांऐवजी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स आदी नवीन शाखांचा समावेश आहे. मागील काही वर्षात देशभरात अभियांत्रिकीच्या प्रवेशाकडे (engineering admission) विद्यार्थ्यांचा कल (students response) कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत.

engineering
नवी मुंबई : तरुणीचा मोबाईल हॅक करणाऱ्यावर गुन्हा

त्यामुळे अनेक महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. तर काहींनी ही महाविद्यालये बंद करून दुसऱ्या शाखाही सुरू केल्या आहेत. तर नव्या महाविद्यालयांना बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक बदल केले.

यात कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्ससारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला. त्यामळे यंदा सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालयात यंदा कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग या विषयाला सर्वाधिक १३ हजार ९५० जागांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा सायन्स या विषयाला ११ हजार ४० जागांना परवानगी देण्यात आली आहे.

मॅकेनिकल, स्थापत्य अभियांत्रिकीत घट

गेल्या काही वर्षात मॅकेनिकल अभियांत्रिकीच्या सुमारे ११ हजार, तर स्थापत्य अभियांत्रिकीच्या सुमारे १० हजार जागा घटल्याचेही परिषदेने दिलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com