
Top Government Schools : देशातील 'या' टॉप सरकारी शाळांमध्ये खासगी शाळांपेक्षा कमी फी अन् चांगल्या सुविधा
Top Government Schools : भारतात अशा अनेक शाळा आहेत ज्या खाजगी नसून सरकारी शाळा आहेत ज्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील सर्वोत्तम शाळेची लिस्ट जाहीर करण्यात आली. यात केंद्र सरकार आणि एनवीएस द्वारा चालवली जाणारी नवोदय विद्यालय दरवर्षी प्रमाणे पहिल्या नंबरवर आहे.
आज आपण अशाच देशातील टॉप सरकारी शाळांविषयी जाणून घेणार आहोत जिथे खासगी शाळांपेक्षा कमी फी अन् चांगल्या सुविधा आहेत. (Top Government Schools in india have less fees and better facilities than private school )
नवोदय शाळा
नवोदय शाळा नेहमीसारखी बेस्ट शाळेमध्ये येते. या सरकारी शाळेमध्ये अॅडमिशनसाठी तुम्हाला एंट्रेस द्यावी लागते. त्यानंतरच अॅडमिशन मिळतं. कमी फी मध्ये चांगल्या शिक्षणासाठी नवोदय शाळा बेस्ट आहे.
हेरिटेज एक्पेरिमेंटल लर्निंग स्कूल, गुरुग्राम, हरियाणा
हेरिटेज एक्पेरिमेंटल लर्निंग स्कूल, गुरुग्राम, हरियाणा ही देशातील बेस्ट शाळेच्या लिस्टमध्ये आहे. येथे कमी पैशात चांगले शिक्षण मिळते.
वसंत वॅली स्कूल दिल्ली
दिल्लीच्या वसंत वॅली स्कूलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण ही शाळा आता बेस्ट स्कूलच्या लिस्टमध्ये आली आहे. दिल्ली सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या या शाळेत तुम्ही अॅडमिशनही घेऊ शकता ते पण कमी फिसमध्ये. विशेष म्हणजे कमी पैशात चांगले शिक्षणही घेऊ शकता.
इनवेंचर अॅकेडमी बँगलोर, कर्नाटक
इनवेंचर अॅकेडमी ही कर्नाटकातील बँगलोरमध्ये आहे. ही शाळा भारताच्या बेस्ट शाळांमध्ये येते. कमी पैशात येथे उत्तम शिक्षण घेता येतं.
दि मदर्स इंटरनेशनल स्कूल
दि मदर्स इंटरनेशनल स्कूल दिल्ली सरकार द्वारा चालवली जाते. दिल्लीच्या या सरकारी शाळेमध्ये खाजगी शाळांसारख्या सोयी सुविधा आहे. अभ्यासासोबतच एक्स्ट्रा अॅक्टीव्हिटीजही घेतले जातात.
दि वैली स्कूल बेंगलुरू, कर्नाटक
दि वैली शाळा ही कर्नाटक राज्यातील बँगलोरमध्ये आहे. या शाळेला भारताच्या बेस्ट स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आलंय.