दुहेरी पदवीसाठी युजीसीच्या ‘गाईडलाईन’

येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी; नवीन शैक्षणिक धोरणाची पार्श्वभुमी
UGC Guidelines for Double Degree pune
UGC Guidelines for Double Degree pune सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच वर्षात दोन वेगवेगळ्या पदव्या प्राप्त करण्याची संधी आगामी शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध झाली आहे. मात्र, हे करत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. दोन्ही पदव्यांची वेळ भिन्न असणे, तसेच दुसरा अभ्यासक्रम हा ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीचा असणे आवश्यक आहे.

नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून दोन पूर्णवेळ पदवी परीक्षांचा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. युजीसीचे अध्यक्ष एम. जगदेशकुमार यांनी मंगळवारी (ता.१२) हा निर्णय घेतल्यानंतर लागलीच मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार युजीसीने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. पीएच.डी. व्यतिरिक्त सर्व अभ्यासक्रमांना ही नियमावली लागू राहणार आहे.

हजेरीचे निकष महत्त्वाचे

विद्यार्थ्यांची किमान हजेरी दोन्ही अभ्यासक्रमांना आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठांना या अभ्यासक्रमांसाठी हजेरीचे निकष ठरवावे लागतील. अनेक विद्यापीठे सध्या ऑफलाइन आणि ऑनलाइन अभ्यासक्रम प्रस्तावित करीत आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग काही आठवड्यांनंतर सुधारित नियम जाहीर करेल असे जगदेशकुमार यांनी म्हटले आहे.

महत्त्वाचे काय

  • २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील अभ्यासक्रमांसाठी लागू

  • एकावेळी दोन पदविका आणि दोन पदवी किंवा दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांची निवड करता येईल

  • पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाचीही निवड करता येईल

  • वर्गांच्या वेळा भिन्न असाव्या लागतील, दूसरा अभ्यासक्रम ऑनलाइन किंवा दूरस्थ असावा

  • मार्गदर्शक तत्त्वे फक्त गैरतांत्रिक, व्याख्यानांवर आधारित पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com