अग्निवीरांच्या कौशल्यांना UGC देणार मान्यता

अग्निपथ भरती योजनेअंतर्गत फक्त चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल.
UGC
UGCsakal

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज अग्निपथ भरती योजनेची (Agnipath Bharati Yojana) घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत देशातील तरुणांना शॉर्ट टर्मसाठी लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. आता यात विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या अग्निवीरांच्या चार वर्षांच्या सेवा आणि कौशल्यांना मान्यता देण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यामुळे अग्निवीर सहजपणे पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

या योजनेंतर्गत सशस्त्र दलात भरती होणारे तरुण मोठ्या संख्येने कौशल्य विकास आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असतील. ज्यामध्ये त्यांचा चार वर्षांचा अनुभव जोडता येईल. यूजीसी लवकरच या दिशेने काम सुरू करणार आहे. (UGC will give recognition to agniveers' skills for getting admission)

फक्त चारसाठी सैन्यात सहभागी

अग्निपथ भरती योजनेअंतर्गत फक्त चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल. यासाठी तरुणांचे वय 17.5 ते 21 वर्षे असावे. यामुळे सैन्यात अल्पकालीन सैनिकांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल. या योजनेअंतर्गत भूदल, वायू दल आणि नौदलात तरुणांची भरती केली जाणार आहे. या योजनेतून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

UGC
टिप्स : अकरावीच्या प्रवेशाची तयारी

20 टक्के तरुणांना सैन्यात राहण्याची संधी मिळणार

या योजने अंतर्गत सरकार संरक्षण दलांचा खर्च आणि वय कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे चार वर्षांनंतर 80 टक्के सैनिकांना या योजनेवर दिलासा मिळणार असून त्यांना पुढील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लष्कर मदत करेल.याशिवाय 20 टक्के तरुणांना सैन्यात राहण्याची संधी मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com