पुणे विद्यापीठातर्फे आगामी परीक्षा डिसेंबरमध्ये; विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२२ सत्राच्या पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाहीत.

पुणे विद्यापीठातर्फे आगामी परीक्षा डिसेंबरमध्ये; विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२२ सत्राच्या पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाहीत. परंतु विद्यार्थ्यांना त्वरित पुन्हा संधी देण्याच्या दृष्टीने आगामी परीक्षा साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आयोजित केल्या जातील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२२ सत्राच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान, विविध विद्यार्थी संघटनांनी निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यांवर संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आली.

‘आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णांची टक्केवारी केवळ समाधानकारक नाही, तर लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे पुनर्परीक्षा घेणे व्यवहार्य नाही. परंतु विद्यार्थ्यांना त्वरित पुन:श्च संधी देण्याच्या दृष्टीने आगामी परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येत आहेत.’ असे काकडे यांनी नमूद केले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पुर्नपरीक्षा घेण्याच्या चर्चेला विद्यापीठाने  प्रकटनाद्वारे पूर्णविराम दिला आहे.

तसेच, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसन व निपटारा तातडीने होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे (प्रमाणपत्र कक्ष) उपकुलसचिव डॉ. अनिल लोखंडे यांची मर्यादित कालावधीसाठी ‘तक्रार निवारण अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक मागण्यांच्या बाबत व शैक्षणिकहिताबाबत परीक्षा विभाग कायम कटिबद्ध असून यासाठी आवश्यक असणारी सर्व उपाययोजना करत असल्याचेही डॉ. काकडे यांनी सांगितले.

Web Title: Upcoming Exam By Pune University In December Students Will Get Another Chance Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..