
UPSC : नागरी सेवा परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकता. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२ ची तयारी करीत असलेले उमेदवार वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. नागरी सेवा परीक्षेच्या ऑनलाइन अर्जाला बुधवारपासून (ता. २) सुरुवात झाली आहे. उमेदवारांना २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
हेही वाचा: शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका
केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. UPSC मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ज्या तरुणांना आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस व्हायचे आहे ते www.upsc.gov.in किंवा www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
हेही वाचा: नात्याला काळिमा! १६ वर्षांच्या मुलीवर बापाचा ५ वर्षांपासून बलात्कार
या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) याचबरोबर सर्व भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाईल. भारतीय वनसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत बसण्यासाठी, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षा सामायिक असतील. नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून २०२२ रोजी होणार आहे.
परीक्षेच्या 2022 च्या महत्त्वाच्या तारखा
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ अधिसूचना प्रकाशन तारीख - २ फेब्रुवारी २०२२
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या नोंदणीची सुरुवात तारीख - २ फेब्रुवारी २०२२
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ नोंदणीची अंतिम तारीख - २२ फेब्रुवारी २०२२
UPSC प्राथमिक परीक्षेची तारीख - ५ जून २०२२
UPSC प्राथमिक प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - मे २०२२
हेही वाचा: मध्यरात्री गेला प्रेयसीला भेटायला; दाट धुक्यामुळे विहिरीत पडला अन्...
नोंदणी कशी कराल
उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ लिंकवर क्लिक करा
लिंकवर क्लिक केल्यानंतर सूचना वाचा
अधिसूचना वाचल्यानंतर नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करा
ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक माहिती प्रविष्ट करा
तपशील नीट वाचा आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा
आता सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज फी भरा
अर्ज फी भरल्यानंतर अर्ज स्क्रीनवर प्रदर्शित होईल
आता फॉर्म डाउनलोड करून घ्या
अर्जाची प्रिंट आउट काढा
Web Title: Upsc Civil Service Examination Registration Process Start
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..