
EPFO Job : सरकारी नोकरी मिळवण्याची आणखी एक संधी; EPFOमध्ये मोठी भरती
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) ५७७ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.
अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे अंमलबजावणी अधिकारी आणि लेखाधिकारी यांच्यासाठी ४१८ पदे राखीव आहेत. तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांसाठी १५९ पदे आहेत. (UPSC will conduct recruitment for EPFO) हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च असेल.
उमेदवारांनी केवळ देय तारखेपर्यंत अर्ज करावा. कारण त्यानंतर वेबसाइट बंद होईल आणि कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. यापूर्वी या पदांची भरती आयोगाने २०२० मध्ये केली होती. त्यावेळी आयोगाने एकूण ४२१ पदे भरली होती.
पात्रता
अधिकृत वेबसाइटवर पात्रतेशी संबंधित माहिती अद्याप दिलेली नाही. परंतु असे मानले जाते की कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर पदवी घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
वय श्रेणी
ज्या उमेदवारांचे वय ३० वर्षे असेल ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. मात्र, केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकतील.