करिअर घडविताना : कमी मार्क्स पडले तर?

आपल्याकडे दहावी बारावीचा निकाल महत्त्वाचा मनाला जातो. चांगले गुण मिळाले म्हणजे सगळे सोपे होते असा समज आहे. चांगले गुण हवेत असे सर्वानाच वाटते.
Hsc result
Hsc resultSakal
Summary

आपल्याकडे दहावी बारावीचा निकाल महत्त्वाचा मनाला जातो. चांगले गुण मिळाले म्हणजे सगळे सोपे होते असा समज आहे. चांगले गुण हवेत असे सर्वानाच वाटते.

- प्रा. विजय नवले

आपल्याकडे दहावी बारावीचा निकाल महत्त्वाचा मनाला जातो. चांगले गुण मिळाले म्हणजे सगळे सोपे होते असा समज आहे. चांगले गुण हवेत असे सर्वानाच वाटते. ते तसे मिळाले की आनंद मिळतो, मनोबल वाढते, काही कोर्सेसच्या प्रवेशांसाठी उपयुक्त ठरते. परंतु बारावीच्या गुणांचा नेमका काय संदर्भ आहे ते पाहू.

बारावी आर्टस् च्या विद्यार्थ्यांना बी.ए. करायचे असल्यास, बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बी. कॉम. तसेच बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना बी.एस्सी प्रथम वर्षासाठी गुण हवे असतात. काही अपवादात्मक महाविद्यालये सोडल्यास प्रवेशासाठी गुणांच्या आधारे विशेष रस्सीखेच नसते. अनेक महाविद्यालये उपलब्ध असल्याने प्रवेश मिळणे अवघड नसते. त्यातच भविष्यात स्पर्धापरीक्षा, एम.बी.ए, सी.ए., सी.एस., सेट-नेट, वगैरे अन्य स्वप्ने असतील तर त्याचा या गुणांशी फार संबंध येणार नाही.

मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आदींसाठी तर त्यांच्या स्वतंत्र प्रवेशपरीक्षा आहेत. एन.डी.ए., सी. ई. टी., नीट, जे.ई.ई., नाटा आदी परीक्षा प्रत्यक्ष करिअर ठरविणार आहेत. बोर्डाच्या परीक्षेतील गुण केवळ पात्रतेसाठी महत्त्वाचे आहेत. अर्थात ते नसतील तर मात्र काहीशी समस्या निर्माण होते. परंतु तिथेही खूपच मवाळ वाटावे अशा पात्रतेच्या बाबी असतात.

प्रोत्साहन द्या

बारावीच्या बोर्डाच्या गुणांवरून करिअरच्या काही पर्यायांचा अपवाद सोडला तर विशेष प्रभाव नाही. उद्योजकता, संशोधन, परदेशी शिक्षण, कौशल्यावर आधारित करिअर्ससाठीही हे गुण कमी आहेत म्हणून अडचण होणार नाही. चित्रपट, नाट्य, पायलट, वक्तृत्व, क्रीडा, इंटिरिअर डिझाईन, लेखन, पत्रकारिता, मास मीडिया, अभिनय आदी असंख्य ठिकाणीही या गुणांचा संदर्भ विशेष नाही. परंतु म्हणून मुद्दाम कमी गुण पाडायचे नसतात. तरीही दुर्दैवाने कमी मिळाले तर निराश व्हायची अजिबात गरज नाही. टोकाची स्पर्धात्मकता या निकालात नको आहे, ज्यातून मानसिक ताण कुणी घ्यावा? पालकांनीही कामापुरते गुण मिळालेले असतील तर पाल्यांना उगाच टोमणे मारू नयेत. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी फार काळजी वाटते या सुरात किती मिळाले गुण, याला इतके, तुला किती? या फंदात पडू नये. ज्याला चांगले मिळालेत त्यांचे निश्चितच अभिनंदन. परंतु खूप कमी पडले, अजून हवे होते, हुशार आहे पण परीक्षा अवघड गेली अशी खचवणारी वाक्ये समाजाने टाळावीत.

विद्यार्थ्यांनीही आत्मपरीक्षण करावे. जिथे कमी पडलो तिथे भविष्यात काही सुधारणा करता येईल का त्याचा विचार करणे. काहींच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठीच्या परीक्षा अजून पुढे असतील तर तिथे जोरदार प्रयत्न करण्यासाठी तयार व्हावे. मार्क्स कमी मिळणे हा गुन्हा नाही. एवढे सांगूनही ताण आला तर मन मोकळे करा. खरंच मित्रांनो या निकालांचा एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त विचार करू नये. विद्यार्थ्यांनी गुणांच्या आधारे आपली तुलना इतरांशी करू नये. काहीजण तर चांगले मार्क्स पडूनही खूप कमी पडले असल्याची भावना ठेवून दुःखी कष्टी होतात.खरे तर निराश होण्याची काहीच गरज नसते. कमी मार्क्स पडले तर, आगामी काळात ते अपयश भरून काढण्यासाठी दुप्पट प्रयत्न करू, पर्यायी करिअरचा चा विचार करू, अंतिम मोठ्या यशासाठी जोरदार मेहनत करू. नकारात्मक वाटले तरी कृती मात्र सकारात्मक करू. कारण पुन्हा सांगतोय फारच कमी ठिकाणी या गुणांचा विचार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com