रि-स्किलिंग : कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान

‘फॅक्टरीज ॲक्टच्या कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला.
Reskilling
ReskillingSakal

‘फॅक्टरीज ॲक्टच्या कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला. याचे उत्तर मुलाखतकर्त्याला कितपत माहिती होते, माहीत नाही, पण त्या विद्यार्थ्याने उत्तर दिले. ‘‘सर, फ्रॅंकली स्पिकिंग मला हा सेक्शन आठवत नाही, पण जर माझे सिलेक्शन झाले, तर कंपनीच्या संचालकांना अटक होणार नाही एवढे परफेक्ट काम मात्र माझे असेल.’’

प्रसंगावधान शिकण्यासाठी...

हे उत्तर चूक होते की बरोबर, हा प्रश्न वेगळा. पण त्या तरुणाने प्रसंगावधान दाखवून वेळ निभावून नेली. रोजच्या जीवनात घडणाऱ्या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात? त्यातील किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात आणि किती गोष्टी तुमच्यावर प्रभाव गाजवतात, याचे एक तुलनात्मक स्टेटमेंट बनवल्यावर आपल्या लक्षात खूप काही विचार येतात आणि एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान. या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत निश्चितच घेऊन जाऊ शकतात. आपल्या रोजच्या जीवनात असेच प्रसंगावधान अपेक्षित आहे, पण सर्वांनाच ते जमते असे नाही. प्रसंगावधान ही संभाषण चातुर्याची पहिली पायरी आहे. एखाद्या क्रिटिकल परिस्थितीत आपण गोंधळतो, काय करावे नेमके हेच आठवत नाही. डोक्यात काही येत नाही, तेव्हा हे प्रसंगावधान कामी येते. काही लोकांनाच ही कला जमते, पण त्यांनाच का जमते? प्रयत्न केला तर थोड्याशा अनुभवाने तुम्हालाही जमू शकेल. मुळात प्रसंगावधानाची आवश्यकता कोठे पडते? ती साध्या घटनांत फारसे महत्त्व ठेवत नाही, पण अशा बुद्धीचा कस लागतो तो एखाद्या गंभीर घटनेत. खरंतर मोक्याच्या घटनांच्या वेळी तर्कसंगत बुद्धीचा योग्य वेळी वापर करून परिस्थिती निभावून नेणे म्हणजे प्रसंगावधान.

विश्‍लेषणाची कुवत हवी

प्रश्न आहे ते आणायचे कुठून? दाखवायचे कसे? एखाद्या घटनेकडे बघताना, एखादी घटना अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची कुवत. जॉब करताना आणि करिअरच्या पायऱ्या चढताना प्रत्येकवेळी अगदी किचकट आणि कठीण पद्धतीनेच प्रश्न सोडवायची गरज नसते. एखादे सादरीकरण करताना, एखाद्या प्रश्नाचे उत्तर देताना, एखादी परिस्थिती सांभाळताना बऱ्याचदा हे प्रसंगावधानच उपयोगी येते. तुमच्या अवतीभोवती तुमच्या संबंधित घटना घडते. अगदी स्पंजप्रमाणे ती घटना आणि त्या घटनेमागचे लॉजिक टिपून घेतले, की तुम्हाला विचारांची संगती लावता येईल. काही व्यक्ती बोलण्यात चतुर असतात, त्या शाब्दिक कोडी छान करतात, प्रसंगनिष्ठ विनोद करतात. एखादे गंभीर वातावरण हलकेफुलके करतात. कारण एखादी विसंगती टिपण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. तो त्यांचा स्थायीभाव बनतो, अशा व्यक्तीचे प्रत्येक बोलणे हे त्याचे प्रसंगावधान असते. नव्या काळात हे शिकावेच लागेल, तर आणि तरच निभाव लागण्याची काही शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com