रि-स्किलिंग : प्रभाव निर्माण करण्याच्या पद्धती

कार्यालयात आपला प्रभाव पाडणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, असे करताना तुम्हाला अनेक शक्यतांचा विचार करावा लागतो.
Reskilling
ReskillingSakal

कार्यालयात आपला प्रभाव पाडणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, असे करताना तुम्हाला अनेक शक्यतांचा विचार करावा लागतो. प्रभाव पाडण्याच्या नादात तुम्ही सहकाऱ्यांवरील नियंत्रण गमावू शकता. त्यामुळे तारतम्याने विचार करीत रणनीती आखल्यासच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

संपूर्ण नियंत्रण : आपण आपला कामाचा हेतू योग्य पद्धतीने समजावून सांगितला आणि त्याचा उपयोग दोघांनाही कसा होईल हे अधोरेखित केले, तर संपूर्ण कामाचे नियंत्रण आपण घेऊ शकता. पुढील व्यक्तीला जेव्हा तुमच्या कामात त्याचा काही फायदा दिसतो, तेव्हा तो सहकार्य करायला तयार होतो. चांगला वापर केला गेल्यावर लोक आपल्यास गतिशील म्हणून संबोधतात. तथापि, आपल्या नियंत्रणाची शैली योग्यरीत्या वापरा. जर आपण आक्रमकपणे नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर लोकांना ते आवडणार नाही.

मैत्रीपूर्ण : जेव्हा आपण एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्रत्वाचे नाते तयार करून एखाद्या व्यक्तीवर प्रभाव पडू इच्छित असाल, तेव्हा आपण ही पद्धत वापरू शकता. येथे तुमचा फोकस इतर व्यक्तीवर केंद्रित होतो. त्यांना आपल्याकडून काय हवे आहे किंवा त्यांच्या अपेक्षा आहेत हे तुम्ही समजून घेता. आपण त्यांच्याशी सहमत नसाल, तरीही आपण त्यांना खरोखर काय हवे आहे, त्याची समज किती आहे, हे समजून घेता. तथापि, हे वापरताना काळजी घ्या. आपण याचा जास्त वापर केल्यास लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात.

माघार : या पद्धतीमध्ये आपल्याला असे वाटत नाही, की दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधणे फायदेशीर आहे आणि म्हणूनच तुम्ही चर्चेदरम्यान माघार घेता आणि इतरांना संधी देता. मात्र,, आपण हे कुशलतेने आणि तात्पुरते करण्याचा निर्णय घेतल्यास, आपली शैली रचनात्मक मानली जाऊ शकते. परंतु आपण आपला प्रभाव टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर केल्यास ते अनुत्पादक आहे. याचा उपयोग हुशारीने करा. जेव्हा आपण आपल्या टीमसोबत, आपल्या बॉससोबत किंवा तोलामोलाच्यांबरोबर संवाद साधता, तेव्हा आपल्याला दररोज आणि प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी करण्यासाठी प्रभावित करावे लागते. मात्र, जेव्हा आपल्याकडे थेट नियंत्रण किंवा अधिकार नसतात तेव्हा विविध प्रकारच्या लोकांशी वागताना आपल्याला अधिक चपळ आणि हुशार असणे आवश्यक असते.

आपल्याकडे कोणतेही अधिकृत पद नसतानाही प्रभाव पाडताना भावनिक बुद्धिमत्ता अद्याप महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणून मानली जाते. हे करत असताना आपली कौशल्ये आणि ज्ञानाबरोबरच, मानवी वर्तनाचा अभ्यास पण महत्त्वाचा ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com