संधी करिअरच्या... : बारावीनंतर विधी शाखेतून करिअर

Career-Opportunity
Career-Opportunity

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. विधिज्ञ अर्थात वकील सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. देशात आजघडीला विविध न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज हजारो नवीन खटले दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. वकिलांना वित्तसंस्था, संरक्षण दले, सरकारी व निमसरकारी संस्था, अशासकीय संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग, पत्रकारिता, अध्यापन, वकिली व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत करिअर संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे, जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलनशक्ती.

लॉ शाखेतून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल यापैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लॉमध्ये प्रवेश मिळू शकतो. महाराष्ट्र राज्य सरकारने २०१६पासून बारावीनंतर लॉ शाखेत प्रवेशासाठी एक सीईटी परीक्षा सुरू केली आहे. ही परीक्षा दोन तासांची व दीडशे मार्कांची असते, ज्यात लॉजिकल रिझनिंग, लीगल रिझनिंग, सामान्यज्ञान , इंग्रजी व अंकगणित या विषयांवर प्रश्न असतात. ही परीक्षा मे/जून महिन्यात घेतली जाते, यासाठीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवेशासाठी... 
कायदा क्षेत्रातील सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या उद्देशाने बंगळूर, हैदराबाद, भोपाळ, कोलकता, जोधपूर, रायपूर, गांधीनगर, लखनौ, पतियाळा, पाटणा, कोची, रांची, आसाम, ओडिशा, विशाखापट्टणम, तिरुचिरापल्ली, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, शिमला, जबलपूर व हरियाना आदी २२ ठिकाणी नॅशनल लॉ स्कूलची स्थापना झाली आहे. या कॉलेजमधील प्रवेशासाठी एक समाईक राष्ट्रीय परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दोन तासांची असून त्यात दीडशे प्रश्न सोडवावे लागतात, चुकीच्या उत्तरांसाठी मार्क कापले जातात. या परीक्षेत लॉजिकल रिझनिंग, लीगल रिझनिंग, सामान्यज्ञान, इंग्रजी व अंकगणित या विषयांवर प्रश्न असतात. नमुना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यंदा ही परीक्षा १३ जून रोजी होणार असून, परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. या परीक्षेच्या निकालानंतर या सर्व नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश परीक्षा राबवली जाते. या परिक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती https://consortiumofnlus.ac.in/clat-2021/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नॅशनल लॉ स्कूलमध्ये मास्टर्स डिग्री, अर्थात ‘एलएलएम’ची सोय आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com