संधी करिअरच्या... : ‘आयसर’मधील संशोधनासाठी...

IISER-Pune
IISER-Pune

दरवर्षी लाखो विद्यार्थी शास्त्र शाखा निवडतात, पण अगदी थोड्या विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे असतो, कारण विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही या क्षेत्रात पैसा; प्रतिष्ठा मिळत नाही असे वाटत असते. खरे तर विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनाकडे वळावे म्हणून बारावीनंतर संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने ७ ठिकाणी ‘आयसर’ या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये बारावीनंतर ४ वर्षांचा पदवी कोर्स, तर पाच वर्षांचा मास्टर्स कोर्स उपलब्ध आहे. 

बायॉलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, गणित, जीओलॉजी, डाटा सायन्स , पर्यावरण शास्त्र या विषयांमध्ये मास्टर्स कोर्स तर इंजिनिअरिंग सायन्स आणि इकॉनॉमिक सायन्स या विषयांमध्ये भोपाळ येथे पदवी कोर्स उपलब्ध आहे. मास्टर्स कोर्ससाठी देशभरातली या सर्व संस्थांमध्ये मिळून १६६२ जागा उपलब्ध आहेत, तर पदवी कोर्ससाठी भोपाळ येथे ११५ जागा उपलब्ध आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संस्थांमध्ये तीन मार्गांनी प्रवेश मिळू शकतो. २५ टक्के जागा जेईई (advanced) या परीक्षेमधील मेरीट वर, २५ टक्के  जागा किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या परीक्षेतील मेरीटवर, तर उर्वरित ५० टक्के जागा ‘आयसर’ देशपातळीवर घेणार असलेल्या प्रवेश परीक्षेतून उपलब्ध आहेत. ही प्रवेश परीक्षा पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नागपूर, अमरावती या केंद्रांवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. परीक्षेचा अर्ज ऑन लाइन पद्धतीने  www.iiseradmission.in या संकेतस्थळावरून भरता येईल. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या तीन तासांच्या परीक्षेत प्रत्येक विषयावर १५ प्रश्न असतील; बरोबर उत्तराला ३ मार्क मिळतील, तर चुकीच्या उत्तरांचा प्रत्येकी एक मार्क वजा करण्यात येईल. अकरावी व बारावीच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी कोणत्याही बोर्डासाठी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बसता येईल. मात्र, प्रवेशासाठी पात्रता बारावी बोर्डाला पडलेल्या मार्कांच्या आधारे असेल. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com