संधी करिअरच्या... : कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी...

कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमाची आखणी करून परीक्षांचे नियंत्रण करण्याची संविधानिक जबाबदारी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज या स्वायत्त संस्थेकडे आहे.
Career
CareerSakal

कॉमर्स शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट करिअरइतकेच कंपनी सेक्रेटरी करीअरचेही आकर्षण असते. आपल्या देशात असंख्य कायदे आहेत. कोणतीही कंपनी चालवायची असेल, तर या निरनिराळ्या कायद्यांच्या चौकटीतच चालवावी लागते. कंपनी सेक्रेटरी हा आपली कंपनी कायद्याच्या चौकटीत चालत आहे, ना हे पाहतो. आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा वेग बघता या व्यवसायाला भरपूर संधी आहेत, हे नक्की.

कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमाची आखणी करून परीक्षांचे नियंत्रण करण्याची संविधानिक जबाबदारी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज या स्वायत्त संस्थेकडे आहे. कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी परीक्षा पद्धती त्रिस्तरीय असते. पहिली परीक्षा CSEET (कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट) या नावाने ओळखली जाते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. बारावीनंतर विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत २०० गुणांसाठी १४० प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट प्रोग्रामला प्रवेश मिळतो. सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट इंटरमिजिएट प्रोग्रामला प्रवेश मिळतो. या कोर्सच्याही परीक्षा वर्षांतून दोनदा होतात. या परीक्षेला आठ विषय असून ते दोन मोड्यूलमध्ये विभागलेले असतात. प्रत्येक मोड्यूलमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान चाळीस व मोड्यूलमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळविणे आवश्यक असते. हा प्रोग्राम पास झाल्यावर विद्यार्थ्यांना २४ महिने ट्रेनिंग घ्यावे लागते. इन्स्टिट्यूटने मान्यता दिलेल्या कंपनीमध्ये किंवा कंपनी सेक्रेटरी फर्ममध्ये हे ट्रेनिंग घ्यावे लागते. हे ट्रेनिंग फायनल परीक्षेनंतरही घेता येते मात्र इंटरमिजिएट प्रोग्रामनंतर ट्रेनिंग सुरू केले तर दोन फायदे मिळतात.

१. चोवीस महिने ट्रेनिंग व फायनल परीक्षेचा अभ्यास एकाच वेळी सुरु असल्याने चोवीस महिने वाचतात.

२. ट्रेनिंग मध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा फायनल परीक्षेचे पेपर्स लिहिताना होतो.

फायनल परीक्षेत नऊ विषय असतात जे तीन मोड्यूलमध्ये विभागलेले असतात. प्रत्येक मोड्यूलमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान चाळीस व मोड्यूलमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळविणे आवश्यक असते. फायनल परीक्षा व ट्रेनिंग दोन्ही पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटची मेंबरशिप मिळते. www.icsi.edu या संकेतस्थळावर या कोर्ससंबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे. कंपनी सेक्रेटरी कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी खालीलप्रमाणे...

१. ज्या कंपनीचे शेअर कॅपिटल पाच कोटी रुपयांहून अधिक आहे त्यांना पूर्णवेळ कंपनी सेक्रेटरी नेमावाच लागतो.

२. ज्या कंपन्यांना स्टॉक एक्सेंजवर लिस्टिंग करायचं आहे त्यांना पूर्णवेळ कंपनी सेक्रेटरी नेमावाच लागतो.

३. नोकरी आणि स्वतंत्र प्रॅक्टिस दोन्हीमध्ये कंपनी सेक्रेटरीजना भरपूर संधी उपलब्ध आहेत.

४. भारतातून कंपनी सेक्रेटरी झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये फक्त थोड्या विषयांची परीक्षा देऊन तिथली कंपनी सेक्रेटरीची पदवी मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com