विद्यार्थ्यांनो, तुम्हाला चित्रकलेची आवड आहे का? मग, 'या' आहेत करिअरच्या संधी

want to consider pursuing a career in the arts this are opportunities available
want to consider pursuing a career in the arts this are opportunities available

चित्रकलेत तुमचा हात चांगला आहे? तुमचे हस्ताक्षर सुंदर आहे, तर तुम्ही कला क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करू शकता. कोणत्या संधी या क्षेत्रात आहे, त्यासाठी काय करायचे, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात...
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कलेची आवड आहे, त्यांना ती शिकवून येत नाही. ती मुळातच काही मुलांमध्ये असते. मुलांना शालेय जीवनामध्ये लक्षात येते,की त्यांना कशामध्ये आवड आहे आणि हे विषयानुसार तसेच व्यक्तीनसार बदलत जाते. ज्यांना कलाक्षेत्रात आवड आहे, त्यांनी चुकुनही दुसऱ्या विषयची निवड करू नये. बऱ्याचशा मुलांना कलेमध्ये आवड असते. पण काही कारणामुळे ते आपले क्षेत्र बदलतात. त्या क्षेत्रामध्ये त्यांना यशही मिळते, ते नामवंतही होतात. मात्र त्यांच्या मनात कुठे तरी एक खंत राहतेच. अपूर्ण राहिलेली इच्छा असते, ती पूर्ण झालेली नसते. अशा खूप व्यक्ती भावी आयुष्यात आपली खंत कोठे ना कोठे व्यक्त करतात. त्यामुळे मुलांनी दहावीनंतरच आपले करियर शोधायला सुरुवात केली पाहिजे.

बारावीच्या ‘मराठी युवकभारती’मध्ये नवे काय? जाणून घ्या...

आपली आवड कशात आहे, हे जर मुलांनी ओळखले तर त्यांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी सोपे जाईल . याचा एक फायदा आहे . त्यांची हॉबी आणि प्रोफेशन एकच असल्यामुळे ते लोक आपले काम खूप एन्जॉय करु शकतात आणि आपल्या कामात चांगले यशही मिळवू शकतात. जर तुम्ही यशस्वी लोकांचा जीवन आलेख बघितला, तर क्रीडा क्षेत्रात 'सचिन तेंडुलकर' यांचे पॅशन व आवड एकच होती. त्यांना त्यातच करिअर करायचे होते. त्यामुळे ते यशाच्या मोठ्या शिखरापर्यंत जाऊ शकले. अशीच अनेक उदाहरणे आहेत. तबलावादक झाकीर हुसेन किंवा इतर संगीतकार, गायक हे त्यांचात मुळातच पॅशन व आवड असल्यामुळे खूप मोठे झाले. आवड असल्याने त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये त्यांना हवा तितका पैसा आणि प्रसिद्धी मिळत गेली. 

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

आर्ट कोर्स 
कला क्षेत्रामध्ये डिग्री घ्यायची असेल, तर बारावी हा बेस मानला जातो. बारावी पास झाल्याशिवाय आर्ट कोर्ससाठी तिथे अॅडमिशन मिळत नाही आणि शालेय जीवनातून कला क्षेत्रात जाण्यासाठी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. इंटरमिजिएट परीक्षा ही यासाठी आवश्यक आहे. कारण त्यामध्ये कला क्षेत्राचा प्राथमिक बेस घेतला जातो. नेचर, स्टील लाईफ, डिझाईन इत्यादी विषय आहेत. या विषयांची ओळख होते. त्यामुळे मुलांना आपले विषय निवडणे सोपे जाते. म्हणून इंटरमिजिएट परीक्षा पास असणे आवश्यक आहे. दहावीनंतरही बरेच कोर्स आहेत. पण ते डिप्लोमा कोर्स आहेत आणि बारावीनंतर डिग्री कोर्स आहेत. भावी आयुष्यात डिग्री कोर्सचा बराच उपयोग होतो.

इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करायचे आहे? 'या' आहेत भविष्यातील संधी 

बारावी झाल्यानंतर तसे बरेच कोर्सेस आहेत. यात बॅचलर ऑफ फाइन आर्ट तसेच त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. यामध्ये बीएफए पेंटिंग आणि शिल्पकला, अप्लाइड आर्ट असे विषय आपण निवडू शकतो. अप्लाईड आर्ट म्हणजे जाहिरातीसंबंधी कोर्स आहे. आपल्याला वर्तमानपत्र किंवा मासिक यांच्यासाठी ज्या जाहिराती लागतात. त्यात स्टेशनरीचे डिझाइन्स, कंपनीचे लोगो, सिम्बॉल यां पासून सुरुवात होते. त्याची व्याप्ती खप वाढली आहे. आता त्यामध्येच मर्कंडाझिंग हा एक विषय आहे. यात शोरूमचे फ्रंट शोकस सजवायचे काम असते. इव्हेंटनुसार किंवा सणवारानसार वेगवेगळ्या पद्धतीने शोकेस सजविण्याचे काम यात येते. अॅप्लाइड आर्टमधील हा वेगळा विषय समोर येत आहे. याला डिमांडही खूप आहे. प्रत्येक दुकानदाराला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले दुकान सजवावेच लागते. तसेच अॅप्लाइड आर्टमध्ये इलस्ट्रेशन, टाइपोग्राफी यांसारखे आणखी बरेच विषय समाविष्ट झाले आहेत. यात अॅडव्हर्टायझिंग फिल्म म्हणजे एखादी जाहिरात फिल्मच्या माध्यमातून दाखवणे याचाही समावेश आहे. हे फिल्ड खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांनी या सर्वांचा अभ्यास करून त्यांची कशामध्ये रुची आहे हे ठरवावे.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इंट्रेस्टिंग करीअर; 'या' आहेत संधी

आता सध्याच्या काळात नवीन कोर्स खूप निघाले आहेत. उदाहरणार्थ म्हणजे फॅशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, शू डिझाईन, इंटिरियर डेकोरेशन, टेक्स्टाईल डिझाईन, आर्ट डायरेक्शन, सिरॅमिक अँड पॉटरी यामध्ये बॅचलर फाईन आर्ट कोर्स करता येतो. इतक्या प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला हवे ते तुम्ही निवडू शकता. विद्यार्थ्यांनी या सर्व विषयांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अंतर्मनातून त्यांना काय वाटते, कुठल्या फिल्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला जमेल किंवा आपण त्यामध्ये यश मिळवू शकतो, याचा विचार करावा. तो आपल्या आवडीचा विषय आहे की नाही हेही आवर्जून पाहावे. या सर्व कोर्सेसचा अभ्यास करून मगच त्यांनी ठरवावे. त्यांना बारावी नंतर काय करायचे आहे. बारावीच्या पुढच्या करिअरचा अभ्यास करावा आणि मगच त्यांनी निर्णय घ्यावा की त्यांना काय करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये एकाच विषयांमध्ये न अडकता बारावीच्या परीक्षेच्या नंतर जो वेळ आहे. त्या वेळेत विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व विषयांचा अभ्यास करावा. त्याबद्दल माहिती घ्यावी आणि त्या विषयांमधील तज्ज्ञ जे असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून ठरवावे की आपल्याला कशात करिअर करायचे आहे. विद्यार्थी जो काही विषय निवडेल, त्या विषयावर मन लावून काम केले पाहिजे. या विषयात पूर्वीच्या लोकांनी काय केले आहे. आता हल्ली मार्केटमध्ये काय चालू आहे ट. लोकांची आवड काय आहे आणि या सर्वांपेक्षा मी वेगळे काय करू शकेल, हा पॉझिटिव्ह विचार ठेवून काम केलं तर कोणताही विद्यार्थी आपल्या आवडत्या कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी ठरू शकतो.

- पूनम राणा (चित्रकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com