यंदापासून दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ विषय अनिवार्य

विषय बदलण्यात दिरंगाई झाल्याने राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
यंदापासून दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ विषय अनिवार्य
यंदापासून दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ विषय अनिवार्य

मुंबई : गतवर्षी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केलेला ‘जलसुरक्षा’ विषय यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी विषय म्हणून अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, दहावीत स्वविकास आणि कलारसस्वाद विषयाऐवजी जलसुरक्षा विषय अनिवार्य करण्यास झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थी, शिक्षक संभ्रमात आहेत.

इयत्ता दहावीसाठी स्वविकास व कलारसस्वाद या श्रेणी विषयांऐवजी जलसुरक्षा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्यात आला. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. यासाठीचे पुस्तक मागील महिन्यात बालभारतीकडून बाजारात उपलब्ध करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी पुस्तक बाजारात मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळाकडून चारवर्षांपूर्वीच इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर जलसुरक्षा विषयचा श्रेणी विषय म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यानुसार काही शाळांमध्ये हा विषय विद्यार्थ्यांना पर्यायी विषय म्हणून देण्यात आला होता. मात्र त्याचे छापील पुस्तकच बाजारात उपलब्ध नव्हते, त्यामुळे विषय अनिवार्य करता आले नव्हते. मात्र मागील वर्षी हा विषय नववीत लागू केल्यानंतर यंदा शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून स्पष्टता आणली आहे.

विषय शिकवण्यावर प्रश्नचिन्ह

विषय बदल शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित असते. तसेच याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण होणेही आवश्यक आहे. मात्र हे झाले नसल्याने हा विषय शिक्षकांनी कसा शिकवायचा असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिक्षकांच्या माथ्यावर हा विषय लादला जाणार असल्याचा आरोपही दराडे यांनी केला.

यंदापासून दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ विषय अनिवार्य
भारतातून कोरोना लशींची निर्यात होणार; WHO ने मानले आभार

"बालभारतीने ऑगस्टमध्ये जलसुरक्षा विषयाचे पुस्तक बाजारात आणले. बहुतांश ठिकाणी ते मिळत आहे. शिवाय, आम्ही पीडीएफ प्रतही उपलब्ध करून दिली आहे."

- विवेक गोसावी, बालभारतीचे नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com