इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी Wiproत मोठी भरती; पॅकेज 3.5 लाख

wipro
wipro
Summary

देशातील दिग्गज आयटी कंपनी विप्रो फ्रेशर्सना संधी देणार आहे. Elite National Talent Hunt या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विप्रो भरती करणार आहे.

कोरोना काळात एका बाजुला नोकऱ्यांची संधी कमी होत असताना आयटी कंपन्यांमध्ये मात्र बंपर भरती सुरु आहे. देशातील दिग्गज आयटी कंपनी विप्रो फ्रेशर्सना संधी देणार आहे. Elite National Talent Hunt या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विप्रो भरती करणार आहे. 2022 पर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये किमान 30 हजार जणांची भरती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विप्रोच्या या प्रोग्रॅमसाठी नोंदणीची सुरुवात 23 ऑगस्टपासून सुरु झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे. या अर्जांची छाननी 25 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान होईल. नॅशनल टॅलेंट हंटच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पासिंग इयर हे 2022 तर वयोमर्यादा 25 इतकी असणार आहे. तसंच प्रोजेक्ट इंजिनिअर या पदासाठी ही भरती होणार आहे.

पात्रतेचे निकष काय?

विप्रोने Elite National Talent Hunt साठी पात्रतेचे काही निकष ठरवले आहेत. त्यात B.E./B. Tech पदवी असणे अनिवार्य आहे. तसंच M.E./M. Tech पाच वर्षांचा संलग्न कोर्स हा पुर्णवेळ आणि केंद्रीय किंवा राज्य सरकारची मान्यता असलेल्या संस्थेत झालेला हवा. फॅशन टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी वगळता सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांला 60 टक्के किंवा त्याहून जास्त गुण असणे आवश्यक आहे. दहावी बारावीमध्येही संबंधित उमेदवारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण हवेत. याशिवाय अर्ज करतेवेळी विद्यार्थ्याचे एखादा पेपर बॅक असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र, त्याचे आधीचे सर्व पेपर क्लिअर असले पाहिजेत.

wipro
बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित हे नियम, खिशावर होणार थेट परिणाम

दहावीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जर 3 वर्षांचा गॅप असेल तरी अर्ज स्वीकारला जाईल. उमेदवाराने गेल्या 6 महिन्यात विप्रोकडून घेतलेल्या कोणत्याही परीक्षेत भाग घेतला असेल तर त्याला अर्ज करता येणार नाही. टॅलेंट हंट प्रोग्रॅम अंतर्गत वार्षिक 3.50 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा किंवा त्याच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असायला हवं. भूटान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र द्यावे लागेल.

Wipro's Elite National Talent Hunt: मूल्यमापन कसे होणार?

उमेदवाराचे मूल्यमापन ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर बिझनेस डिस्कशन करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑफर लेटर पाठवण्यात येईल. ऑनलाइन मूल्यमापनात 128 मिनिटांची टेस्ट घेण्यात येईल. यामध्ये तर्कावर आधारित Aptitude Test , Quantitative ability, English (verbal) ability ची टेस्ट घेतली जाईल. तसंच निबंध लेखणासह आणखी एक टेस्ट असेल. याशिवाय कोडिंगसाठी दोन प्रोग्रॅम असणाऱ्या एका ऑनलाइन प्रोग्रॅमिंगची चाचणीही घेण्यात येईल. अर्ज करणाऱ्यांना प्रोग्रॅमिंगसाठी जावा, सी, सी++ किंवा पायथन निवडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com