‘विज्ञान’ संशोधन शिष्यवृत्तीतून महिलांना मिळणार बळ

राज्यातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पाठबळ देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.
Scholarship
ScholarshipSakal
Summary

राज्यातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पाठबळ देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.

पुणे - पुणे नॉलेज क्लस्टर (पीकेसी) आणि बीएएसएफ केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात ‘विज्ञान’ या राज्यातील महिलांसाठी संशोधन शिष्यवृत्ती उपक्रमासाठी करार करण्यात आला आहे. या करारानुसार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आणि महिला उद्योजकांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

राज्यातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पाठबळ देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. तसेच संशोधन आणि उद्योजकतेमध्ये शिक्षण आणि करिअरच्या अप्लाइड नॅचरल सायन्सेस, स्पेशॅलिटी केमिकल्स, ॲग्रो-केमिकल्स, न्यू मटेरिअल्स, फार्मा- मेडिसिनल केमिस्ट्री आणि सस्टेनेबिलिटी या क्षेत्रात आणि संबंधित क्षेत्रांमध्ये ही शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहे. हा दोन वर्षांचा कार्यक्रम उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील मुलींना रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करेल. तसेच सुरूवातीच्या टप्प्यातील महिला उद्योजकांना सहा महिन्यांसाठी निर्वाह निधी तसेच उद्योगांच्या संवर्धनासाठी पाठिंबा दिला जाईल, तसेच प्रोटोटाईपिंग करता अनुदान पुरविले जाणार आहे, अशी माहिती पुणे नॉलेज क्लस्टरचे ‘पीकेसी’चे प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर डॉ. अजित केंभावी यांनी दिली. याशिवाय जिल्हा परिषद आणि पीकेसी यांच्या सामंजस्य करार करण्यात आला असून त्याद्वारे शाळा विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही डॉ. केंभावी यांनी सांगितले.

अर्ज कसा कराल -

- शिष्यवृत्तीसाठी १ जूनपासून प्रवेशिका उपलब्ध होतील

- अधिक माहितीसाठी : ‘www.pkc.org.in’

- अर्ज करण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत

- अर्जासोबत प्रकल्प प्रस्ताव किंवा प्रकल्प मार्गदर्शिकेद्वारे पडताळलेली कल्पना आवश्यक

शिष्यवृत्तीसाठी निकष -

- उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील मुली

- पदवीधर पदवी : बीएस्सी / बीटेक / बीई / बी फार्म अंतिम वर्षातील

- पदव्युत्तर पदवी : एमएससी / एमटेक / एमई/एम फार्म अंतिम वर्षातील

- पदवी पूर्ण केल्यानंतर एक वर्ष पूर्णवेळ उद्योजकतेचा अभ्यास करण्यास इच्छुक

- सुरवातीच्या टप्प्यातील महिला उद्योजक

अशी असेल शिष्यवृत्ती -

- पदवीपूर्ण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी : प्रती महिना दहा हजार रुपये (३ महिन्यांसाठी)

- पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी : प्रति महिना १५ हजार रुपये (६ महिन्यांसाठी)

- सुरवातीच्या टप्प्यातील महिला उद्योजक : साडे सहा लाख रुपये अनुदान आणि प्रती महिना १५ हजार रुपये (६ महिन्यांसाठी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com