नोकरी, बाजारपेठ : खेळातील अचूक संधी शोधा!

खेळात किंवा खेळाडूंमधील महत्त्वाचा घटक कोणता तर ‘खिलाडूवृत्ती!’ स्पोर्ट्समध्ये करिअर करताना ही वृत्ती अत्यावश्यक आहे.
sports opportunity
sports opportunitysakal

- यश लाहोटी

खेळात किंवा खेळाडूंमधील महत्त्वाचा घटक कोणता तर ‘खिलाडूवृत्ती!’ स्पोर्ट्समध्ये करिअर करताना ही वृत्ती अत्यावश्यक आहे. यात हार किंवा जीत दोन्ही गोष्टी सहजपणे पचविण्याची ताकद असते. आपल्या देशात खेळाचे अनेक प्रकार उपलब्ध असून त्याला प्रोत्साहनही दिले जात आहे. त्यातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. खेळाची आवड आहे, खेळाविषयी माहिती आहे, त्यांनी करिअर म्हणून या क्षेत्राची गांभीर्याने निवड करावी.

खेळ किंवा त्याच्याशी संबंधित व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ''हार्डवर्क'' ला कोणताही पर्याय नाही. कोणत्याही खेळात टीममध्ये सहभागी होण्यासाठी सराव आणि मेहनत घ्यावीच लागणार आहे. नेमकी संधी कशात आणि कोठे आहे हे पाहून तशी ‘स्ट्रॅटेजी’ आखावी. खेळात जसे हे सूत्र लागू होते तसेच खेळाशी संबंधित व्यवसायातही यशस्वी होण्यासाठी हार्डवर्क, स्ट्रॅटेजी आणि लक हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. त्यावर सतत फोकस करायला हवा.

प्रत्येक व्यवसायात किंवा क्षेत्रात ज्या अडचणी येतात त्यात स्पोर्ट्समध्ये करिअर करताना येत असतात. खेळाडूंना लोक जसे डोक्यावर घेतात, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी केली जाते. त्यातून अनेक जणांना निराशा येण्याची शक्यता असते. तुमचा खेळातील परफॉर्मन्स ढासळतो, तेव्हा तुम्ही किती चांगली कामगिरी केली होती हेही पाहिले जात नाही. त्यामुळे खेळात आणि व्यवसायातही निराश व्हायचं नसेल तर सोशल मीडियावर होणाऱ्या निगेटिव्ह कॉमेंट्स वर अजिबात लक्ष देऊ नये.

योग्य कारणासाठी त्या विषयातील फक्त तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगल्या मेंटॉरची निवड करा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. अनेकांचे सल्ले घेऊन स्वतः मधील गोंधळ वाढवू नये. सध्या मेंटल कोच ही खेळाडूंची गरज बनली आहे. जर तुमचे डोके शांत असेल तुम्ही तुमचे काम किंवा खेळ अधिक कार्यक्षमतेने करू शकता. आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांची विभागणी करता यायला हवी. दीर्घकाळ येऊ शकणाऱ्या अडचणींवर काम करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

खेळाडू म्हणून करिअर करताना अनेक जण बेसिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या मोठ्या खेळाडूंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तो ग्रॅज्युएट झाला नाही, त्याचे काय बिघडले म्हणून अनेक जण मध्येच शिक्षण सोडतात, हे योग्य नाही. किमान तुम्ही पदवीधर तरी असायलाच हवे. तरच तुम्ही खेळाडू म्हणून पुढे गेला नाही तरी इतर ठिकाणी करिअर करू शकता. खेळाडू म्हणून चमकता आले नाही किंवा संधी मिळाली नाही तरी खेळाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला संधी मिळवता येईल, अशी तयारी करावी.

कॉमेंट्रीटर, कोचिंग, मॅनेजमेंट, जर्नालिझम, यूट्यूबर असे असंख्य पर्याय सहज उपलब्ध आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे येथेही काही धोके आहेत. योग्य काळजी घेतली तर त्यावरही मात करता येते. खेळाडूंच्या भोवती ग्लॅमर असते. सेलिब्रिटी म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते, अशा वेळी तुमच्यावर झालेले संस्कार, आई-वडिलांसोबतचे बॉण्डिंग, कोठे स्पष्टपणे नाही म्हणायचे या गोष्टी शिकायला हव्यात. योग्य नियोजन केले, संधी शोधली तर स्पोर्ट्स ही भविष्यातील करिअरची सर्वात चांगली संधी आहे, हे नक्की!

स्पोर्ट्समध्ये करिअर करताना

  • हार्डवर्कला योग्य स्ट्रॅटेजीची जोड द्या

  • सोशल मीडियावरील टीकेला महत्त्व देऊ नका

  • योग्य मेंटॉरची निवड करा

  • खेळाडूंनी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे

(लेखक ‘वुमन्स क्रिक झोन’ या स्पोर्ट्स मीडिया कंपनीचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com