नोकरी, बाजारपेठ : स्पोर्ट्स स्टार्टअप

सध्या स्टार्ट अप विषयी खूप बोलबाला आहे. स्वतःच्या कल्पनांमधून व्यवसायाची संधी मिळते. स्पोर्ट्समध्येही भारतासोबतच जगभरात यशस्वी झालेले स्टार्टअप आहेत.
Sport Startup
Sport Startupsakal
Summary

सध्या स्टार्ट अप विषयी खूप बोलबाला आहे. स्वतःच्या कल्पनांमधून व्यवसायाची संधी मिळते. स्पोर्ट्समध्येही भारतासोबतच जगभरात यशस्वी झालेले स्टार्टअप आहेत.

- यश लाहोटी

एखाद्या खेळाविषयी तुम्हाला चांगली माहिती असेल, त्या खेळाविषयी उत्सुकता असल्यास तो खेळ खेळता आला नाही तरी चालेल. त्या खेळा भोवतीचा कोणताही व्यवसाय तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकता. व्यवसायाच्या अनेक संधी तुमच्या खेळाविषयीच्या ज्ञानामधून निर्माण होऊ शकतात. खेळात करिअर करायचे आहे त्यांना खेळाडू आणि खेळाशी संबंधित व्यवसाय अशी दुहेरी संधी आहे.

आपल्या देशात वेगवेगळ्या खेळाविषयी प्रचंड जागृती, रस निर्माण झाला आहे. ऑलिंपिकसह विविध स्पर्धांमध्ये आपले खेळाडू पदके आणत आहेत. क्रिकेट विषयी आपल्याकडे पहिल्यापासूनच प्रचंड प्रेम आहे. महिला क्रिकेटला सध्या चांगले दिवस आले असून, अनेक नवे खेळाडू तयार होत आहेत. आपल्या देशात जगातील बहुतेक खेळ खेळले जात आहेत, भवानी देवी ही तलवारबाजीत चमकली, तेव्हा हा खेळ अनेकांना माहितीही नव्हता. प्रत्येक खेळात आपल्याकडे स्टार महिला खेळाडू आहे. त्यांचा आदर्श घेत मुली तयार होत आहेत. आपण जास्तीत जास्त खेळ पाहू तेवढी त्याविषयी आवड निर्माण होईल.

सध्या स्टार्ट अप विषयी खूप बोलबाला आहे. स्वतःच्या कल्पनांमधून व्यवसायाची संधी मिळते. स्पोर्ट्समध्येही भारतासोबतच जगभरात यशस्वी झालेले स्टार्टअप आहेत. खेळ पाहणाऱ्यांची, खेळणाऱ्यांची संख्या जगभर वाढत आहे, सहाजिकच संधी वाढत आहेत. केंद्र सरकार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी करत आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस अशा ठराविक खेळांभोवतीचे स्टार्ट अप जास्त प्रमाणात आहेत. जगभरातील खेळांचा विचार केल्यास स्टार्टअपला मोठे होण्यासाठी बराच वाव आहे.

‘स्टार्ट अप सुरू करण्यासाठी काय तयारी करावी लागते?’ फार वेगळी तयारी करावी लागत नाही. तुमच्यात पॅशन, रिस्क घ्यायची तयारी असेल, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचे ज्ञान आणि आपण यातून काहीतरी मोठे करू हा विश्वास असेल तर स्टार्ट अप निश्चित यशस्वी होऊ शकतो. स्टार्ट अपसाठी पैसे उभारण्याची तयारी ठेवा, बदलांची आणि अपयश आले तरी खचून न जाता धडपड करण्याची तयारी ठेवावी लागते.

मुली आणि मुलांनाही स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्समध्ये नोकरी आणि व्यवसाय अशा संधी आहेत. याशिवाय जर्नालिझम, सोशल मीडिया, एज्युकेशन अशा कितीतरी प्रकारात करिअरच्या संधी आहेत. या संधीसाठी तुम्हाला स्पोर्ट्समधील एखादी पदवीच पाहिजे असेही नाही. जो खेळ तुम्हाला नीट माहिती असेल तर त्यात करिअर होऊ शकते. ‘वुमन्स क्रीक झोन’ ने महिला क्रिकेट खेळाडूंची माहिती देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला, त्यातून कंपनी आकारास आली.

स्पोर्ट्समध्ये करिअर करताना

  • खेळाविषयी पूर्ण माहिती हवी

  • स्टार्ट अपसाठी नवनवीन खेळ निवडा

  • रिस्क घेण्याची आणि अपयश पचविण्याची ताकद ठेवा

  • जास्तीत जास्त खेळ पहा

  • ‘मेक इन इंडिया’ परंतु ‘मेक फॉर वर्ल्ड’ दृष्टिकोन हवा.

(लेखक ‘वुमन्स क्रीक झोन’ या स्पोर्ट्स मीडिया कंपनीचे संस्थापक सीईओ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com