
Yoga Course : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पुण्यात योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम सुरू
पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमास सुरवात झाली. यानिमित्त कर्वे समाज सेवा संस्थेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेत मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरु झाले असून त्याअंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुनंदा राठी, प्रा. सुरेंद्र निरगुडे, कर्वे समाज सेवा संस्थेच्या संचालिका डॉ. शर्मिला रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राठी म्हणाल्या,‘‘योग म्हणजे ध्यास, आपल्या कामाप्रती प्रेम म्हणजे योग. आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा माध्यम म्हणजे योग आहे.’’
‘‘समर्पित भावना ठेऊन काम करणे आणि योग ही माणसाच्या मेंदूची गरज असल्याचे मत प्रा. निरगुडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यास केंद्राचे संयोजक ॲड. जयंत कंधारकर यांनी केले. अभ्यासक्रमाचे प्रमुख धनंजय इंचेकर यांनी अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मुकेश सावकारे याने केले.