
ओमिक्रॉनचा धोका; मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्रपरीक्षा होणार ऑनलाईन
YCMOU Exams : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) संभाव्य धोक्यामुळे शैक्षणिक क्षेत्र पुन्हा ऑनलाइनकडे वळू लागले आहे. यापूर्वी ऑफलाईन परीक्षा घेण्याचे जाहीर केलेले असतांना, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) हिवाळी सत्रपरीक्षा ऑनलाइन (winter session exams) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जानेवारीऐवजी आता ही परीक्षा ८ फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ अंतर्गत हिवाळी सत्र परीक्षा ऑफलाइन घेणार असल्याचे मुक्त विद्यापीठातर्फे जाहीर केले होते. परंतु या दरम्यान ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे ही परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून होणार होत्या. परंतु यातही बदल केला असून, आता ८ फेब्रुवारीनंतर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
प्रमाणपत्रपासून तर पदवी, पदव्युत्तर पदवी अशा एकूण ५६ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षा मुक्त विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार आहेत. शिक्षणक्रमनिहाय परीक्षेचे वेळापत्रक मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
हेही वाचा: भारतीय सैन्यात इंजिनीअर उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा डिटेल्स
असे असेल परीक्षेचे स्वरुप
ऑनलाइन पद्धतीने होत असलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येकी दोन गुणांसाठी असे एकूण चाळीस प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. परीक्षेत मिळालेल्या गुणांचे वर्गीकरण अंतिम परीक्षेच्या शीर्षाखाली ऐंशी गुणांमध्ये दर्शवले जाईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांखाली उपलब्ध चार पर्यायांसमोर असलेल्या रेडिओ बटन दाबून योग्य उत्तराची निवड विद्यार्थ्यांना करायची आहे.
वेब कॅमेऱ्याचे गैरप्रकारांकडे लक्ष
ही परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी सॉफ्टवेअरद्वारे, वेब कॅमेर्याच्या माध्यमातून परीक्षार्थीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच यासंदर्भात परीक्षार्थींना वेळोवेळी सूचना (वॉर्निंग) दिली जाईल. मर्यादेपेक्षा वॉर्निंग दिल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होईल. व अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठात बोलवून समज दिला जाणार आहे.
हेही वाचा: संजय राऊतांची राणेंचे नाव न घेता खरमरीत टीका, म्हणाले गुन्हेगारांना..
Web Title: Ycmo University Winter Session Exams Will Be Held Online After 8th February See Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..