प्रचार संपला अन् पडला नोटांचा पाऊस! चिंचवडमध्ये सापडली १४ लाखांची रोकड|Chinchwad ByEelction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रचार संपला अन् पडला नोटांचा पाऊस! चिंचवडमध्ये सापडली १४ लाखांची रोकड|Chinchwad ByEelction

प्रचार संपला अन् पडला नोटांचा पाऊस! चिंचवडमध्ये सापडली १४ लाखांची रोकड|Chinchwad ByEelction

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अखेर आज संपला. यानंतर रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडेल. या दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार पार पडला.

भाजप-शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेत्यांनी इथं प्रचार सभा घेतल्या. त्यामुळं मतदान किती होईल आणि कोण निवडून येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता पैशांचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.

प्रचार संपताच चिंचवडमध्ये १४ लाखांहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमधील दळवीनगरमध्ये ही रक्कम घेऊन जाणारी कार ताब्यात घेतली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ध्वनि प्रचार संपल्यानंतर उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत असतात अशा प्रसंगी रोकड सापडली मात्र ही रोकड कोण, कुठं आणि कशासाठी घेऊन जात होता याचा तपास निवडणूक आयोग आणि पोलिस घेत आहेत, मात्र ही रोकड सापडल्यामुळे चिंचवडमध्ये धन शक्तीचा वापर होत नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरम्यान १० तारखेला देखील याच दळवीनगर भागात निवडणूक विभागाच्या पथकाने ४२ लाखांची रोकड ताब्यात घेतली होती.

चिंचवडमध्ये आचारसंहिता लागू आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, वाहनांची तपासणी केली जात आहे.