
Kasaba Bypoll: उमेदवारी जाहीर होताच रासने दगडूशेठच्या चरणी, म्हणाले "बापटांच्या मार्गदर्शनाखाली"
पुण्यातील चर्चेतील पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रक्रिया दिली आहे.
रासने यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली . रासने यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली. ते म्हणाले की, "कसबा विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार आहे, रासने यांची पहिली प्रतिक्रिया होती.
पुढं म्हणाले, बापट साहेब यांची प्रकृती थोडी खराब पण ते बुद्धीने तेवढेच तल्लग आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली, कसबा विधानसभा निवडणूक लढवली जाईल.
देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी केली होती पण विरोधी पक्षाला ही निवडणुक बिनविरोध करायची नव्हती त्यामुळे भाजप देखील ही निवडणूक लढवण्यास सक्षम आहे,अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली आहे.