“ही निवडणूक बिनविरोध झाली असती, तर…निकालापूर्वी अश्विनी जगतापांची भावनिक प्रतिक्रिया: Chinchwad By Election Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By Election Result

Chinchwad By Election Result : “ही निवडणूक बिनविरोध झाली असती, तर…निकालापूर्वी अश्विनी जगतापांची भावनिक प्रतिक्रिया

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, निकालापूर्वी चिंचवड उमेदवार अश्विनी जगताप यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Chinchwad By Election Result)

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळाली होती.

Kasba ByPoll Result : ...म्हणून धंगेकर कधीच कारमध्ये बसत नाहीत; टॉकिजमध्येही गेले नाही

चिंचवडमध्ये 50 टक्केच मतदान झालं आहे. आज निकाल लागणार आहे. त्यापूर्वी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

'ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं.' असं वक्तव्य जगताप यांनी केलं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहे. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर लगेच निवणुका लागल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Kasba Chinchwad By-Election Result Live: चिंचवडमध्ये चुरशीची लढत; अश्विनी जगताप आघाडीवर

तसेच, मला आज साहेबांची (लक्ष्मण जगताप) खूप आठवण येतेय. निकालाकडे बघताना तसा फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणी असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले.

ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला, सभा घेतल्या. भाजपाचे आख्ख्या भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन. अशी भावना जगताप यांनी व्यक्त केली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 87 हजार 145 मतदरांनीच मतदानाचा अधिकार बजावाला.