
Chinchwad Bypoll: कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेणार? उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा
Chinchwad News: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. मात्र शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली आहे.
दरम्यान आज शिवसेनेचे नेते आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली आहे. आहिर यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप राहुल कलाटे यांना दिला आहे.
त्याच बरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोन वरून चर्चा झाली आहे. त्यामुळे कलाटे यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत सुचक विधान केले आहे.
राहुल कलाटे म्हणाले, पक्षश्रेष्ठींचा आदर करणार. माझ्या कार्यकर्त्यासोबत बोलून उमेदवारी मागे घेण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. आज तीन वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.