
Pune By Election Result: विजया आधीच अभिनंदन! खुश झालेल्या अजित पवारांचा धंगेकरांना फोन
Kasba By Election Result 2023: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निर्णायक आघाडीकडे झेपावत आहेत. भलेही सातव्या फेरीमध्ये हेमंत रासनेंनी धंगेकरांच्या लीडला ब्रेक लावला, पण त्यापुढच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा धंगेकर पुढे निघून गेले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यातल्या पेठा भाजपच्या बाजूने असतात, असं सांगितलं जातं. परंतु हा एक समज असल्याचं पुढे येत आहे. कारण पुण्यातल्या पेठांनी भाजपला नाकारुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं दिल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान धंगेकर यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा फोन आला होता. अजित पवार यांनी रविंद्र धंगेकर यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजून अधिकृत मत मोजणी पार पडली नाही, तरी देखील मविआ मधून अनेक मोठ्या नेत्यांचे फोन धंगेकर यांना येत आहेत.
तर धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करू लागले आहेत. शेवटच्या दोन फेऱ्या बाकी आहेत. आताच्या घडीला रविंद्र धंगेकर हे ६ हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.