मॅक्रॉन यांनी फ्रान्सची सत्ता राखली

सलग दुसऱ्यांचा विजय; उजव्या विचारसरणीच्या मरीन पेन पराभूत
Emmanuel Macron wins French presidential election
Emmanuel Macron wins French presidential electionsakal

पॅरिस : फ्रान्समध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी विजय मिळवित आपली सत्ता कायम राखली आहे. त्यांच्या विजयामुळे युरोपमधील इतर देशांनी आनंद व्यक्त केला आहे. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेले मॅक्रॉन हे गेल्या वीस वर्षातील पहिलेच नेते असले तरी त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन यांनाही चांगल्या प्रमाणात मते मिळाली. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत मॅक्रॉन यांना ५८.५५ टक्के मते मिळाली, तर पेन यांना ४१.४५ टक्के मते मिळाली.

उजव्या विचारसरणीच्या नेत्याला आतापर्यंत इतकी मते कधीही मिळाली नव्हती. मॅक्रॉन यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी आयफेल टॉवर परिसरात जमा होत जल्लोष केला. नॅशनल रॅली पक्षाच्या मरीन पेन यांनी या पराभवातही आपला विजय असल्याचे म्हटले आहे. मॅक्रॉन यांनी विजयानंतर आनंद व्यक्त करताना फ्रान्सला अधिक मजबूत करण्याचे आश्‍वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मॅक्रॉन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत ७२ टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. १९६९ च्या निवडणुकीनंतर प्रथमच इतके कमी मतदान झाले. जवळपास एक तृतियांश मतदारांनी मतदानच केले नाही. अनेकांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता मतपेटीत कोरीच मतपत्रिका टाकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com