Kasba Bypoll Result : कसब्यात चित्र बदललं! धंगेकरांच्या आघाडीला ब्रेक; रासनेंनी लावला जोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba By Election hemant rasane

Kasba Bypoll Result : कसब्यात चित्र बदललं! धंगेकरांच्या आघाडीला ब्रेक; रासनेंनी लावला जोर

पुणेः कसबा पेठ निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत रासने यांची आघाडी मोडीत निघाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सातव्या फेरीमध्ये ४ हजार २७० मतं घेतली.

कसब्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरु केला आहे. कसब्यामध्ये सध्या तरी सर्व अनिश्चित दिसून येत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले रवींद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली आहे.

धंगेकर हे सहाव्या फेरीअखेर ३ हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र सातव्या फेरीमध्ये रासनेंना ४ हजार २७० मतं मिळाली तर धंगेकरांना २ हजार ८२४ मतं मिळाली १ हजार २७४ मतांनी रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. त्यांच्या आघाडीला ब्रेक लावण्याचं काम हेमंत रासने यांनी केलं आहे.

पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये रासने आघाडीवर गेले आहेत.मुळातच कसब्यात दीड लाख मतदान झाल्याने ही निवडणूक अटीतटीची होत आहे. अद्यापही निर्णायक आघाडी कुणालाही मिळालेली नाही.

टॅग्स :Pune Newselection