
Kasba Bypoll Result : पुण्यातल्या पेठांचा मूड बदलला; मतदारांनी भाजपला का नाकारलं?
Pune Bypoll Result 2023: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निर्णायक आघाडीकडे झेपावत आहेत. भलेही सातव्या फेरीमध्ये हेमंत रासनेंनी धंगेकरांच्या लीडला ब्रेक लावला, पण त्यापुढच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा धंगेकर पुढे निघून गेले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यातल्या पेठा भाजपच्या बाजूने असतात, असं सांगितलं जातं. परंतु हा एक समज असल्याचं पुढे येत आहे. कारण पुण्यातल्या पेठांनी भाजपला नाकारुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं दिल्याचं स्पष्ट होत आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पेठेतील अनेक परिसरातून धंगेकर आघाडीवर आहेत. यामध्ये कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे.
अकराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर हे ३ हजार १२२ मतांनी आघाडीवर आहेत. धंगेकर हे सहाव्या फेरीअखेर ३ हजार मतांनी आघाडीवर होते.
मात्र सातव्या फेरीमध्ये रासनेंना ४ हजार २७० मतं मिळाली तर धंगेकरांना २ हजार ८२४ मतं मिळाली १ हजार २७४ मतांनी रवींद्र धंगेकर आघाडीवर होते.
त्यांच्या आघाडीला ब्रेक लावण्याचं काम हेमंत रासने यांनी केलं होतं. परंतु पुन्हा धंगेकर पुढे निघाले आहेत. पुण्यातल्या जो भाग भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, तो म्हणजे पेठा. तरीही रासनेंना नाकारलं जातंय.