
रविंद्र धंगेकरांच्या विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले... |Kasba By-Election Result
कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली.
या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले आहेत.
या निकालावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले माझी आता स्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो.
कसब्यात गेले २५ वर्षे भाजपकडे हा मतदारसंघ होता. मात्र आम्ही योग्य रविंद्र निर्णय घेऊन रविंद्र धंगेकर यांना उमेदवार दिली. त्यावेळेसच आम्ही आर्धी निवडणुक जिंकलो होते अशी प्रतिक्रिया दिली.
धंगेकर यांनी महापालिकेला निवडणुकीत भाजपच्या एका ताकतीच्या नेत्याला पराभूत केले होते. महविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी एकजूट करण्यात आम्हा यशस्वी ठरलो, या पोटनिवडणुकीत या सत्ताधारी पक्षाने सर्व गोष्टींचा वापर त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील याचा वापर केला, निवडणुक जिंकण्यासाठी ज्या,ज्या गोष्टींची गरज होती त्या-त्या गोष्टींचा वापर करून देखील मविआने ती जागा खेचून आणली आहे. अशी प्रतिक्रिया अजित पावारांनी दिली आहे.