मतदानापूर्वी कसब्यातील नागरिकांना मारहाण; भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल: Kasba by poll election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election beaten woman money last night bjp Ravindra dhangekar

Kasba by poll election: मतदानापूर्वी कसब्यातील नागरिकांना मारहाण; भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. मात्र, यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या असल्याचे पाहायला मिळालं. काल म्हणजेच शनिवारी कसब्यातील नागरिकांना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kasba Bypoll Election beaten woman money last night bjp Ravindra dhangekar)

मतदानापूर्वी, रात्री उशीरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरुन मोठा गोंधळ झाल्याचा पाहायला मिळालं. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. रात्री उशीरा या सगळ्या प्रकारामुळे गंज पेठेत मोठा गोंधळ झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

गंजपेठ परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण केली. कालपासून सगळीकडे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हरिहर यांना डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला.

त्यांनी गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी आरोप केले. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पैसे वाटप आणि दबाव याला विरोध करत काल रात्री महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. कसबा पेठ पोट निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप काल धंगेकर यांनी केला होता.

रात्रीही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सांगत लोया नगर गंज पेठ भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. नागरिकांनी पोलिसांकडे या बाबत कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत हे आरोप करण्यात आलेत.

टॅग्स :BjpPune News