
भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... |Kasba Bypoll Result
कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली.
या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले आहेत.
निकाला नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, आम्ही या पराभवाचे आत्मचिंतन करू, मात्र तुम्हाला देखील आत्मचिंतन करावं लागणार आहे तिन राज्यांच्या निवडणूका झाल्या काँग्रेस कुठे दिसतच नाहीये, त्यामुळे थोडं आत्मचिंतन नाना पटोले तुम्ही करा थोड आम्ही करू" अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी विधान भवनात दिली आहे.
दरम्यान भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. 'काटे की टक्कर' अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.