

बाळापूर : विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत रोजी दाखल केलेल्या अर्जावरून दिसून येते. मतदारसंघातून यावेळी पाच उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. विद्यमान आ.नितीन देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार बळीराम सिरस्कार, वंचितचे नतिकोद्दीन खतिब यांनी दंड थोपटले आहेत, तर प्रहार जनशक्तीचे कृष्णा अंधारे व मनसेचे मंगेश गाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.