

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (MVA) बॅनरखाली काँग्रेसने मोठा प्लॅन आखला आहे. तेलंगणा व कर्नाटकमध्ये यश मिळवून दिलेल्या योजनांवर आधारित मास्टर प्लॅन तयार करण्याची योजना आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहतील.