

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात यंदाही परंपरागत लढत रंगणार आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रा. वरिंद्र जगताप आणि भाजपचे प्रताप अडसड हे पुन्हा एकदा आमनेसामने असणार असून, त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नौलेश विश्वकर्मा हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या तिन्ही उमेदवारांमुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील निवडणूक संघर्ष अधिकच रंगतदार होणार आहे.