Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर अंतरवालीत आज बैठक; रणनीतीकडे लक्ष !
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ता मनोज जरांगे यांची प्रकृती बुधवारी बिघडली होती, पण आता ती स्थिर आहे. डॉक्टरांनी अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर उपचार केले.
वडीगोद्री : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती बुधवारी बिघडली होती. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर व सहकाऱ्यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जरांगे यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.