

मोहोळ विधानसभा : संपूर्ण जिल्ह्याने लक्ष वेधलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला दिलेली उमेदवारी अचानक बदलून भूमिपूत्र राजू खरे यांना उमेदवारी दिली आहे.