

नागपूर : विधानसभा निवडणुकीत यावर्षी पुन्हा एमआयएम आणि वंचितने धक्कातंत्राचा वापर केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी मोठा उलटफेर केला होता. त्यामुळे या निवडणुकीत हे पक्ष कुणाला धक्का देणार यावर चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप आणि कॉंग्रेसला चांगलाच घाम फोडला होता.