

नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी केल्याने त्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेतली आणि बैठक घेऊन समजूत काढली. मात्र, वर्षभरापासून परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून अधिकृत उमेदवाराला आव्हान देणारे नरेंद्र जिचकार यांना कसे रोखायचे असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे.