

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कथित सिंचन घोटाळ्यासाठी दिवंगत आर. आर.पाटील यांना जबाबदार धरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. आज आबा (आर.आर. पाटील) हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी अशा पद्धतीने चर्चा करणे योग्य नाही. पण अजित पवार मोदींच्या वॉशिंग मशिनमध्ये गेल्यामुळे धुतल्या गेले हे स्पष्ट आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.