
Vidhansabha Election News 2024 : उत्तर मुंबई विधानसभा क्षेत्रामध्ये बोरिवली या महत्त्वपूर्ण मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा विजय झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय भोसले यांचा त्यांनी पराभव केला आहे. जवळपास लाखभर मतांच्या फरकाने त्यांना पराभव झाला आहे. संजय उपाध्याय 139947 मतांनी विजयी झाले आहेत. संजय भोसले यांचा 100257 इतक्या फरकाने पराभव झाला आहे.