.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांची पक्षांतरे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशात आज काँग्रेसचे पाच वेळचे मुंबईतील नगरसेवक रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर लगेचच त्यांना भाजपचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.
दरम्यान राजा यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की भाजपमध्ये पुढील काळात अनेक मोठे प्रवेश होणार आहे. मात्र, यावेळी त्यांनी प्रवेश करणाऱ्यांची नावे सांगणे टाळले.
याचबरोबर फडणवीस यांनी निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा असेल की, महायुतीचा यावरही उत्तर दिले आहे.