मोदींचे पुतीनशी चांगले संबंध; भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही?

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mamata Banerjee on Indian Student Died in Ukraine
Mamata Banerjee on Indian Student Died in Ukrainee sakal

उत्तर प्रदेशमध्ये आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दजन्य परीस्थिती आहे. यामध्ये भारतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांना युध्द होणार हे आधीच माहित होते असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

वारणसी येथे प्रचारा दरम्यान पंतप्रधानांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना पंतप्रधान मोदी मात्र येथे सभा घेत आहेत, काय आवश्यक आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या, तुमचे पुतीनशी इतके चांगले संबंध असतील तर युद्ध होणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत होते मग तुम्ही भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती ममता बॅनर्जी यांनी केली.

Mamata Banerjee on Indian Student Died in Ukraine
मी अनेकदा गोळीबार झेललाय; तुम्हाला घाबरत नाही; ममतांचा तिखट वार

उत्तर प्रदेशातील मतदान सुरु आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत. याठिकाणी कोण नशीब आजमावणार, कोणत खात उघडणार हे निकाला दिवशीच कळणार आहे. मात्र, मतदानाच्या ठिकाणी मतदारांचा उत्साह बघून आपण सत्ता काबीज केल्याचा आनंद नेतेमंडळी व्यक्त करत आहेत. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण लागले आहे.

Mamata Banerjee on Indian Student Died in Ukraine
पूर्वांचलच्या राजकारणात आझमगडचा ठसा; सपाच्या 'MY' समीकरणाची खरी कसोटी

ममता बॅनर्जी यांनी यावेळी प्रचारसभेत त्यांनी भाजपबाबतचे आपले अनुभव शेअर करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, परवा मी विमानतळावरून घाटाकडे जात होते. तेंव्हा मी माझी गाडी थांबवताना काही भाजप कार्यकर्त्यांना पाहिलं. ज्यांच्या मेंदूत गुंडगिरीशिवाय दुसरं काही नाहीये. त्यांनी माझ्या गाडीवर लाठ्या मारल्या आणि मला परत जाण्यास सांगितले. मग मला समजले की ते गेले आहेत. मात्र, यातून भाजपचं नुकसान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com