चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर का? स्वतः नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया |Chinchwad By-Election Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By-Election Result

चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर का? स्वतः नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया |Chinchwad By-Election Result

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आता समोर आलेल्या कला नुसार चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर आहेत.

दरम्यान 'सकाळ'ने घेतलेल्या नाना काटे यांच्या प्रतिक्रियेत काटे यांना राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका बसत असल्याचे सांगितले. तर १२ व्या फेरीत चांगल्या प्रमाणात मताधिक्य मिळेल अशी इच्छा देखील नाना काटे यांनी बोलून दाखवली. मात्र ३७ फेऱ्या असल्यामुळे चिंचवडचा निकाल लागण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

दुसरीकडे कसबा पोटनिवडणूकीत रविंद्र धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरी पासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर भाजपच्या प्रभागातून देखील रासने यांना म्हणावं असं लिड मिळताना दिसत नाही. १२ फेऱ्या पार पडल्या असून शेवटच्या ८ फेऱ्या बाकी आहेत.

टॅग्स :Ajit PawarNCP