UP Election 2022: सपा, बसपा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत- योगी

सपाचे सरकार उत्तर प्रदेशाच्या हिंदूना मारून दहशतवाद्यांना साथ देते-योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath
CM Yogi AdityanathCM Yogi Adityanath

उत्तर प्रदेशातील (UP Election 2022) निवडणूकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाचा उत्साह पाहून सपा आणि बसपाच्या (BSP) अनेक नेत्यांनी परदेशात पळून जाण्यासाठी बुकिंग सुरू केले आहे. त्यांची नेते मंडळी नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही असे होऊ देणार नाही तर संयुक्त गस्त सुरु करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिली. आज ते आझमगडमध्ये जनतेला संबोधित करत होते.

समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) निशाणा साधताना योगी म्हणाले, सपा नेहमीच अवैध काम करते. सपाचे सरकार उत्तर प्रदेशाच्या हिंदूना मारून दहशतवाद्यांना साथ देत आहेत असा आरोप योगींनी केला आहे.

Summary

सपाचे सरकार उत्तर प्रदेशाच्या हिंदूना मारून दहशतवाद्यांना साथ देत आहेत असा आरोप यागींनी केला आहे.

CM Yogi Adityanath
Ukraine Russia War: नवीनच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

फुटीचे राजकारण अयशस्वी

पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्ये वांशिक फूट पाडण्याचा भाजपची राजनीती गेल्या वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे अयशस्वी ठरली आहे. एरवी जाट-मुस्लिमांमधील अंतर या आंदोलनाने मिटविले व ते एका छत्राखाली आले आहेत. मध्य ‘यूपी’ आणि अवधमध्ये फुटीचे राजकारण चालले नाही. त्यामुळे भाजपने कायदा व सुरक्षा आणि महिला सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. पण या दोन्हीला अखिलेश यादव यांनी अतिशय हुशारीने तोंड दिले. त्याला त्यांची पत्नी व माजी खासदार डिंपल यादव व खासदार जया बच्चन यांचीही साथ मिळाली.

माफियांत निवडणूक लढवण्याची हिंमत नाही

जेव्हा माफियांच्या अवैध धंद्यावर बुलडोझर चालतो, तेव्हा मऊ तमाशा पाहून टाळ्या वाजवतात. मऊच्या जनतेला सुरक्षिततेची हमी मिळायला नको का? या सरकारची भीती अशी आहे की, आज माफियांत निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. आता मऊचा कोणताही नागरिक धमक्यांच्या दबावाला बळी पडत नाही, तर धमक्यांना योग्य तो धडा शिकवतो, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com