BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FM Nirmala Seetharaman announce India budget will increase the income of farmers doubled union budget 2021

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलनावरुन तयार झालेली तणावाची परिस्थिती यामुळे शेतकरी या बजेटकडे डोळे लावून बसले होते.

BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार

मुंबई - शेतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली. मात्र आता ती प्रत्यक्षात कशी उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सीतारमण यांनी शेती क्षेत्रासाठी एकूण 16.5 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावागावातील शेतीशी संबंधित बाजारपेठा या शहराला जोडण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठीही सरकार विशेष प्रयत्नशील असणार आहे. ज्यावेळी सीतारमण यांनी शेतक-यांचे बजेट मांडण्यास सुरुवात केली तेव्हा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावर्षीच्या बजेटमध्ये शेतक-यासांठी काय मोठी घोषणा करणार याकडे लक्ष लागले होते. त्यांनी यंदा शेतीसाठी 16.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलनावरुन तयार झालेली तणावाची परिस्थिती यामुळे शेतकरी या बजेटकडे डोळे लावून बसले होते. मात्र त्यांना समाधानकारक किंवा आश्वासक असे काही त्यातून मिळाले नाही असेही सांगण्यात येत आहे. सध्या देशात शेतकरी संतप्त झाला आहे. त्यानं मोदी सरकारनं तयार केलेल्या शेतकरी विधेयकाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनी झालेला गोंधळ यामुळे त्या दिवसाला गालबोट लागल्याची खंत राष्ट्रपतींनीही व्यक्त केली होती.

फेब्रुवारीमध्ये होणार 5 मोठे बदल; वाचा सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम?

सीतारमण यांनी शेतीसाठी जी तरतूद केली त्यात त्यांनी सर्वप्रथम करण्यात गावागावातील बाजारपेठा आणि शहरांशी जोडण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या म्हणाले आणखी शंभर भाजी मंडई उभारण्याचा आमचा विचार आहे. तसेच देशातील 1.68 शेतक-यांनी इनामचे रजिस्ट्रेशन केले आहे. उर्वरीत शेतक-यांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तो आमचा महत्वाचा उद्देश असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितले. तामिळनाडूमध्ये एक खास सी बीच पार्क तयार केले जाणार असून त्या धर्तीवर अन्य ठिकाणीही तसा प्रयोग केला जाणार आहे. यातून त्या संबंधीचे उद्योग करण्यासाठी शेतक-याला फायदा होणार असून त्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

UNION BUDGET 2021 Agriculture: बजेटमधून शेती क्षेत्राला काय हवयं ?

2022 पर्यत शेतक-यांचे उत्पन्न हे दुप्पट करण्यावर भर दिला जाणार आहे. आम्ही त्या निर्णयावर कायम आहोत. आता जे बजेट सादर करण्यात आले आहे ते मोठ्या बिकट काळात तयार करण्यात आले आहे. कोविडमुळे आपले झालेले हाल आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींवर झाला असल्यानं आता सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य व्यक्ती आणि त्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही सीतारमण यांनी सांगितले.